Views*विश्व हिंदू परिषदेचा वर्धापन दिन व जिल्हा व्यापक बैठक संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा येथील भारतमाता मंदीर येथे दि. 30 ऑगस्ट रोजी विश्व हिंदू परिषदेचा स्थापना दिवस हा वर्धापनदिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रांत सहधर्माचार्य प्रमुख किशोर कुलकर्णी, प्रांत समरसता प्रमुख व्यंकटराव गायकवाड, धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चवरे, जिल्हामंत्री श्रीकृष्ण धर्माधिकारी, जिल्हा सयोंजक विक्रम साळुंके,हभप गजानन चौगुले आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीकृष्ण धर्माधिकारी यांनी केले. उपस्थितांना मार्गदर्शनपर बोलताना किशोर कुलकर्णी म्हणाले की, गावोगावी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने स्थापणा दिवस साजरा करून यानिमित्त कोरोनासारख्या महामारीविषयी समाजात लसीकरणासाठी जनजागृती व पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपन तसेच मंदिर व सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करावी. यानंतर काही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. या वेळी हभप विषुपंत मुंडे अणदूर, हभप अण्णाराव बिराजदार हिप्परगा, हभप परमेश्वर शिंदे धुता, लोहारा भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, दत्तात्रय सलगरे, राजेंद्र सूर्यवंशी, प्रमोद पोतदार, दत्तात्रय दंडगुले, बालाजी चव्हाण, महेश कुंभार, शहाजी जाधव, शिवशंकर हत्तरगे, सचिन रसाळ, युवराज जाधव, किशोर होणाजे, अविनाश बलसुरे, अमर कोळगे, मारुती पांचाळ, अरविंद जावळे, अनिरुद्ध कारभारी, संतोष पाटील, राजकुमार शिनगारे, नरहरी क्षीरसागर, रमेश पाटील, शंकर जगताप, हनुमंत रसाळ, दीपक दरेकर, शैलेश नकाशे, यांच्यासह रा.स्व. संघ, वि.हीं. प. बजरंग दल, भाजपा आदी संघटनेचे जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम साळुंके व समारोप जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चवरे यांनी केले.

 
Top