Views*महादेव राजकुमार कारभारी यांची शिवा संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी निवड*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील सामाजिक कार्यकर्ते, शिवबसव सामाजिक बहूद्देशीय संस्थाचे अध्यक्ष महादेव राजकुमार कारभारी यांची शिवा लिंगायत युवक संघटना, लोहारा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. उस्मानाबाद शहरातील अलंकार हॉटेल येथे झालेल्या जिल्हा बैठकीत हि निवड करण्यात आली. निवडीचे पत्र जिल्हा संपर्क प्रमुख सतीश अप्पा कानडे व राज्य सचिव विठ्ठल अप्पा खरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मल्लिनाथ सारणे, गणेश घोडके, नागेश निर्मले, सागर शेरकर, वैजिनाथ कारभारी, आकाश पाटील, काशिनाथ लकडे, अदि, उपस्थित होते. या निवडीबद्दल महादेव कारभारी यांचे लोहारा तालुक्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
 
Top