Views


*सामान्याला असामान्य बनवण्याचे पीठ म्हणजे रानफूल व्यासपीठ -- बापु काळे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

नवोदीतांना आदर, मान, सन्मान देऊनआणि त्यांच्या लेखणीची दखल घेऊन सामान्याला असामान्य बनवण्याची खासियत रानफूलने जपली आहे. असे प्रतिपादन काव्य मैफलाध्यक्ष कवी गझलकार बापू काळे यांनी केले. उस्मानाबाद लेणी मंदीर निसर्ग रम्य परिसरात रानफूलच्या श्रावणकाव्यधारा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उदघाटक डॉ.मदन देगावकर प्रमुख पाहुणे म्हणुन उपसंपादक महादेव आवारे उपस्थितीत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, रानफूल साहित्य व्यासपीठ हा केवळ सोशल मिडीया वरील समुह नसून साहित्य क्षेत्रातील तीर्थक्षेत्र आहे. या वेळी निसर्ग काव्य मैफलीत नंदिनी मुपडे पाटील यांच्या ' मनातला पाऊस ' या काव्यसंग्रहाचे मान्यवराच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आले. रानफूल साहित्य व्यासपीठने श्रावण काव्यधारा मैफलीचे आयोजन केले होते यंदाचे हे सहावे वर्ष असून रानफूल साहित्यीकांची विनामूल्य सेवा करत आला आहे.वृक्षांना जलार्पण करून काव्य मैफलीला सुरुवात करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना मान सन्मान देऊन त्यांच्या लेखणीची दखल घेऊन समाजापुढे रानफूलकडून एक आदर्श ठेवला जात असल्याचे रानफूलच्या अध्यक्षा कवयित्री कांचनगंगा मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगीतले. यावेळी कांचनगंगा मोरे, डॉ.मदन देगावकर, बापू काळे,अनिता देशमुख, संगिता भांडवले, विजयकुमार भालेकर, मनीषा क्षीरसागर, अकबर मुलाणी, शांता सलगर , हरिश्चंद्र खेंदाड, मंदाकिनी नेमाने, संतोष चव्हाण, सुवर्णा शिनगारे, हणमंत पडवळ, ईश्वरी काळे, शंभूराजे खेंदाड, प्रणव आवारे, प्रिया मुपडे, नंदिनी मुपडे, श्रुती आवारे, तन्वी खडके, संदेश देगावकर, सारंग क्षीरसागर रोहन करंडे , संजय भालेकर, आयान मुलाणी, ईश्वर काळे यांनी आपल्या बहारदार रचना सादर करून बाल काव्य ,प्रेम, माया, समता ,निसर्ग, श्रावण, गड किल्ले इत्यादी सह सामाजिक विषयावर प्रकाश टाकला. डॉ.मदन देगावरांचे आकाशी झेप घेरे पाखरा या भावगीत गायनाने लेणी परिसर मंत्रमुग्ध झाला तर उखाणी घेण्याच्या कार्यक्रमाने सर्वजण मनमुराद हसले.सहकुटुंब उपस्थिती व बालचमुंनी बागडत हसत निसर्गानंद घेत घेतलेला मोकळा श्वास ही कार्यक्रमाची लक्षवेधी होती. कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रीकरण रानफूल चॅनल प्रमुख अशोक खडके यांनी केले. सुत्रसंचालन मंदाकिनी नेमाने, हणमंत पडवळ यांनी केले. तर उपस्थितीतांचे आभार रानफूलचे संस्थापक हरिश्चंद्र खेंदाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्षा मनीषा क्षीरसागर , स्वाती देगावकर, विजयालक्ष्मी खेंदाड यांनी परिश्रम घेतले. शेवटी निसर्ग सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 
Top