कळंब/प्रतिनिधी
भारतीय स्टेट बँकेच्या वतीने कळंब पोलिसांना पावसापासून संरक्षण देनेरे कोट चे वाटप मंगळवार ता.३१ रोजी करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत भारतीय स्टेट बँकेच्या वतीने कळंब येथील पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी यांना पावसापासून संरक्षण देणारे कोट पोलीस निरीक्षक यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहेत.
भारतीय स्टेट बँक कोणत्या ना कोणत्या सामाजिक बांधिलकीची जपणूक करीत असून आम्ही अशा प्रकारचे सहाय्य करीत असल्याचे शाखा प्रबंधक सचिन ढोमे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बँकेचे क्षेत्रीय अधिकारी सतीश ...शाखा उपप्रबधक महेश आनंदगांवकर, श्रीकांत कळंबकर, हरिभाऊ कांबळे आदीसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.