Views



*उस्मानाबाद येथे सर्व पक्षीयांच्या वतीने कै.सि.ना.आलुरे गुरुजीना श्रद्धांजली, उस्मानाबाद जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रावर कै.आलुरे गुरुजी यांचा एक आदर्शवादी प्रभाव होता -- बसवराज पाटील कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

शिक्षण महर्षी, माजी आमदार, शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे संस्थापक सचिव *कै.सि. ना. आलूरे गुरुजी* यांच्या निधनाने , सर्व पक्षीयाच्या वतीने शनिवार, दि.7 ऑगस्ट 2021 रोजी सायं.4 वाजता उस्मानाबाद येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या शोकसभेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष जीवनराव गोरे, डॉ. प्रतापसिंह पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे भाई अविनाश देशमुख, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, जनता बँकेचे अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी, माजी नगराध्यक्ष विश्वासआप्पा शिंदे, आदी मान्यवरांनी आलूरे गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेराव, नितीन बागल, भाजपचे नेते मिलींद पाटील, शिवसेना गटनेते सोमनाथ गुरव, नगरसेवक बाळासाहेब काकडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील गर्जे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव बंटी जाधव, क्रेडाईचे अध्यक्ष रणजित रणदिवे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष नितीन तावडे, प्राचार्य डॉ.रमेश दापके, शिक्षक संघटनेचे बशीर तांबोळी, बालाजी तांबे, प्रशांत चौधरी, फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीझनचे धर्मवीर कदम, अलीमोद्दीन शेख, नंदकुमार गवारे, अशोक पवार, मध्यवर्ती शिवजयंती समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस दिलीप भालेराव, संघटक राजाभाऊ शेरखाने, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, माजी नगरसेवक सय्यद खलील सर, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, जावेद काझी, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, धनंजय पाटील, अलीम शेख, विश्वजित शिंदे, राहुल लोखंडे, प्रसन्न कथले यांच्यासह सर्व पक्षीय व विविध सामाजिक चळवळीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आलूरे गुरुजींच्या प्रतिमेस अभिवादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले तर प्रास्ताविक अग्निवेश शिंदे यांनी केले.




 
Top