Views


*भारताला सुवर्णपदक ; उस्मानाबाद येथे  आनंदोत्सव, जल्लोष* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

टोकीयो (जपान ) येथे सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताने आज भालाफेक मध्ये सुवर्णपदक मिळविले. उस्मानाबाद येथे क्रीडा संघटना व खेळाडूंच्या वतीने  जल्लोष करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उस्मानाबाद शहरातील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर शनिवारी दि.7 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुवर्णपदक भारताने पटकावल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवून  भारत माता की जय घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले, जिल्हा तायकांदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, थ्रोबॉल असोसिएशनचे सचिव बालाजी कानडे, जिल्हा टेनिक्याटिक संघटनेचे रामकृष्ण खडके, कुस्ती परिषदेचे गोविंद घारगे, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे जावेद शेख, हुंकार बनसोडे, यांच्यासह क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top