Views*लघु उद्योगांसाठी युवकांना केंद्राचे मोठे सहकार्य -आ.राणाजगजितसिंह पाटील*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

देशातील नव उद्योजकांना उभे करण्यासाठी पंतप्रधान मा.ना.श्री.नरेंद्रजीमोदी यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत असून लघु उद्योगासाठी केंद्राकडुन मोठे सहकार्य होत असल्याचे नमुद करत जिल्हयातील युवकांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करत यासाठी आवश्यकते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही आ.राणाजगजितसिंहजी पाटील यांनी कुंभारी ता.तुळजापूर येथे विविध कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले. कुंभारी येथे मोहरम निमित्त सवारी उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने आलावा चौकाच्या विकासासाठी येथील ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे आमदार स्थानिक विकास निधी उपलब्ध करून दिला होता. सदरील काम पूर्ण झाले असून या कामाचे लोकार्पण आ.राणाजगजितसिंहजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता, अण्णाभाऊ साठे नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता, संत रोहिदास नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता तसेच जनसुविधा योजनेमधून मागासवर्गीय स्मशानभूमीत निवारा बांधणे आदी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तत्पूर्वी नालंदा बुद्ध विहार येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. तुळजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून गावागावात विकास कामांना भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान मा. ना. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील ‘आत्मनिर्भर भारत’ प्रत्यक्षात घडविण्यासाठी अनेक क्रांतिकारी व सर्वसमावेशक निर्णय घेत पायाभूत सुविधांसाठी अभूतपूर्व अशा मोठ्या गुंतवणुकीसह आर्थिक विकासाला चालना देण्याकरिता रोजगार स्वयंरोजगार निर्मितीवर भर देत छोटे व्यावसायिक व उद्योजकांसाठी नव नवीन योजना राबविल्या जात आहेत. मा.ना.श्री.नितीन गडकरी, मा.ना.श्री.नारायण राणे, मा.ना.श्री.पियुष गोयल यांच्यासारखे कॅबीनेट मंत्री केंद्रात आहेत. अनेक प्रकल्पांसाठी त्यांची मदत घेणे शक्य आहे. उस्मानाबाद शहरांमध्ये महिलांच्या माध्यमातून अगरबत्ती उद्योग सुरू करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे सावरगाव येथे शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज उभारण्यात येत आहे. जिल्ह्यात शेती पूरक व्यवसायासह अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. यासाठी नाबार्ड च्या अनेक योजना आहेत. महाराष्ट्राचे सुपुत्र माननीय नामदार श्री नारायण जी राणे साहेब यांच्याकडे मध्यम, लघु व सूक्ष्म (MSME) उद्योग मंत्रालयाचा कार्यभार असल्याने त्यांची आपल्याला यासाठी हक्काने मदत मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जास्तीत जास्त लघु उद्योग उभारून येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देत कुंभारी येथे युवक व महिलांसाठी प्रत्येकी किमान एक तरी उघु उद्योग सुरु करावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे व लवकरच गावात लघु उद्योजकांसाठी मार्गदर्शक शिबीर घेण्याची ग्वाही आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी दिली. उद्योगासाठी आवश्यक किमान भाग भांडवल जमा करणे, कर्ज प्रकरण मंजुरी, सहतारण यासह प्रकल्प मंजुरीसाठी आवश्यक त्या परवानग्या व केंद्राचे सहाय्य मिळुन देण्यासाठी योग्य ती मदत केली जाईल. या अनुषंगाने दि.१२ ऑगस्ट २०२१ रोजी सांयकाळी ७ वाजता कुंभारी येथे शिबीर आयोजीत करण्यात येणार असुन परिसरातील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रसंगी जि.प. अध्यक्षा अस्मिता कांबळे, सभापती (पं.स.)दिवा इंगोळे, उप सभापती प.स. दत्ता शिंदे, प.स.सदस्य चित्तरंजन सरडे, प.स.सदस्य शरद जमदाडे, प.स.सदस्य शिवाजी गोरे, प.स.सदस्य सिंधु कोरे, ओबीसी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, मंगरुळ माजी उपसरपंच प्रतापसिंह सरडे, कुंभारी सरपंच सौ. संगीता कोळी, उपसरपंच श्री संतोष क्षीरसागर, श्री राजाभाऊ वडणे (कार्यकारी अभियंता महावितरण), श्री प्रताप तांबे, तात्यासाहेब तांबे, माजी सरपंच अमिरोद्दीन पटेल, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.


 
Top