Views



*माझी शेती माझा सातबारा मीच भरणार माझा पिकपेरा या अंतर्गत तलाठी व कृषी सहाय्यक यांचे प्रशिक्षण*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

माझी शेती माझा सातबारा मीच भरणार माझा पिकपेरा भरणार यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ई - पीक पाहणी डेमो अॅप उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी यासाठी लोहारा येथील पंचायत समिती सभागृहात दि.11 ऑगस्ट रोजी लोहारा तालुक्यातील सर्व तलाठी व कृषी सहाय्यक यांचे ई पीक पाहणी संदर्भात प्रशिक्षण घेण्यात आले. या अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये पेरणी केलेल्या पिकांचा पिक पेरा हा स्वतः ई पीक पाहणी या अप्लिकेशन मध्ये भरावयाचा आहे. तरी तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक व तलाठी यांनी समन्वयाने हे अॅप डाऊनलोड करून याबाबतची सविस्तर माहिती प्रत्येक गावात जावुन शेतकऱ्यांची बैठक घेऊन यांना सविस्तर माहिती पटवुन सांगावी. हे काम दि.14 ऑगस्ट पर्यंत पुर्ण करण्यात यावे, असे सविस्तर मार्गदर्शन तहसीलदार संतोष रुईकर व तालुका कृषी अधिकारी मिलिंद बीडबाग यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार रणजीत शिराळकर, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक उपस्थित होते.




 
Top