Views


*दक्षिण जेवळी येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत जवळपास एकोणीस लक्ष रुपये खर्च*


उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत जवळपास एकोणीस लक्ष रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात येत असलेल्या येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन दि.10 ऑगस्ट रोजी पंचायत समितीचे सभापती सौ. हेमलता रणखांब यांच्या हस्ते करण्यात आले. चार वर्षांपूर्वी जेवळी ग्रामपंचायतीतून विभक्त होऊन दक्षिण जेवळी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली आहे. दक्षिण जेवळी, पश्चिम तांडा व रुद्रवाडी या तीन वस्तीचीचे दक्षिण जेवळी बीट ग्रामपंचायत आहे. येथे नव्याने ग्रामपंचायत स्थापित झाल्यानंतर येथील सोसायटी गोडाऊनची डागडुजी करून ग्रामपंचायत कार्यालय म्हणून वापरली जात होती. यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी येथील जिल्हा परिषद सदस्या सौ.शोभाताई तोरकडे व सरपंच चंद्रकांत साखरे हे प्रयत्नशील होते. आता राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत जवळपास एकोणीस लक्ष रुपये मंजूर झाले असून येथील मध्यभागी असलेल्या खुल्या जागेत ही इमारत बांधण्यात येत आहे. नव्याने बांधण्यात येत असलेल्या येथील ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे भूमिपूजन पंचायत समितीचे सभापती सौ. हेमलता रणखांब यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या शोभाताई तोकडे या होत्या तर प्रमुख म्हणून पंचायत समितीचे उपसभापती व्यंकट कोरे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, उप अभियंता व्यंकटेश चिडगुपकर, सरपंच चंद्रकांत साखरे, शाखा अभियंता आर एस पाटील, रेवणसिध्द करंटे, बाजार समितीचे संचालक शामसुंदर तोरकडे, सहाय्यक गट विकास अधिकारी संजय ढाकणे, माजी मुख्याध्यापक बी. एम.बिराजदार, महादेवप्पा तांबडे, ग्राम विकास अधिकारी शिवानंद बिराजदार, ठेकेदार विजय काळे, धनराज टिकांबरे, हणमंतप्पा भुसाप्पा,  ग्रामपंचायत सदस्य महादेव पवार, विवेकानंद बिराजदार, अंबिका बिराजदार, नंदाबाई बोंदाडे, राम मोरे, प्रविण बोंदाडेे, दत्तात्रेय गाडेकर, मल्लिनाथ साखरे, आदीं उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुधीर येणेगुरे यांनी केले. 
Top