Views*विकास दुत प्रकलपच्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयक पदी प्रा.शहीदा सय्यद* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

त्रिशरण इंलाईटमेंट फाउंडेशन अंतर्गत विकास दूत प्रकल्पाच्या जिल्हा समन्वयक पदी प्रा‌‌.शहीदा सय्यद यांची नियुक्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. समाजातील वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित, वंचित घटकांना शासकीय व निमशासकीय योजनांची माहितीचा प्रचार, प्रसार करून, गाव, शहर, वाडी, वस्ती, तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहचवण्याचे तसेच महिला सक्षमीकरणाचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सय्यद मॅडम यांनी मागील पाच वर्षात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण पुणे अंतर्गत काम करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभगाच्या अनु.जाती,जमाती,साठी असणाऱ्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करून लाभर्थ्यना लाभ मिळवून दिला आहे. म्हणूनच त्रिशरन एनलाईटमेंट फाउंडेशन पुणे च्या संपदिका प्रज्ञा वाघमारे मॅडम व विकास दूत प्रकल्प संचालक दिगंबर वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद मॅडम विकास दुत प्रकल्प जिल्हा समन्वयक उस्मानाबादची जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत.
 
Top