Views




*पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा उस्मानाबाद जिल्ह्यात 14 व 15 ऑगस्टला दौरा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख हे दि.उस्मानाबादचे आणि 15 ऑगस्ट 2021 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार,दि.14 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 08.00 वा.शासकीय मोटारीने अहमदनगर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा.मौजे मस्सा (खंडेश्वरी), ता.कळंब येथे आगमन आणि विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वा. मौजे मस्सा (खंडेश्वरी)येथून उस्मानाबादकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वा. जिल्हा ग्रंथालय इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.(स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी मैदान,उस्मानाबाद). दुपारी 01.00 वा. उस्मानाबाद येथून लोहाराकडे प्रयाण. दुपारी 01.50 वा. लोहारा येथे आगमन व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नगरपंचायतीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 02.20 वा. लोहारा येथून उमरगा तालुक्याकडे प्रयाण. दुपारी 03.10 वा. उमरगा येथे आगमन व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नगर पालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ – झोपडपट्टी, मेन रोड, उमरगा) दुपारी 03.40 वा. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील हमाल भवनाचा लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 05.00 वा.उमरगा येथून उस्मानाबादकडे प्रयाण. सायंकाळी 06.30 वा. उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव आणि मुक्काम. रविवार,दि.15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 09.00 ते 09.45 वा. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 09.45 वा. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे कृषी विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.00 वा.नगरपरिषद येथे आगमन व नगरपरिषद स्थापना दिनानिमित्त आयोजित उस्मानाबाद भूषण पुरस्कार व कार्यगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वा. अहमदनगर कडे प्रयाण करतील.




 
Top