Views


*बालाजी पवार पाडोळी (आ) यांच्या रेशीम प्रकल्पाला क्युबा राष्ट्राचे राष्ट्रीय रेशीम सल्लागार डॉ. अधिकराव जाधव यांची भेट* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, क्युबा राष्ट्राचे रेशीम प्रकल्प राष्ट्रीय सल्लागार, महाराष्ट्र राज्य रेशीम समिती सदस्य प्रा.डॉ.अधिकराव जाधव यांनी 
पाडोळी (आ) येथील बालाजी पवार यांच्या रेशीम प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी यांच्याशी रेशीम विषयावर चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना असे सांगितले की दर महा ५०,००० ते १,००,००० रू. उत्पन्न निघू शकते हे बालाजी पवार यांनी सिद्ध केले. तसेच रेशीम बागेचे व्यवस्थापन व घ्यावयाची काळजी या विषयवार चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव वामन गाते यांनी डॉ.जाधव यांचा सत्कार केला. यावेळी बालाजी पवार यांनी आभार मानले. यावेळी घुगी, समुद्रवानी, सारोळा, पाडोळी (आ) येथील शेतकरी उपस्थित होते.
 
Top