Views



*प्रशासकीय बदल्यातून परिचारिकांना वगळण्याची मागणी, काळ्या फिती लावून परिचारिकांनी केले कामकाज*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

राज्य शासनाने ऑगस्टमध्ये जिल्हा बाह्य बदल्यांचे आदेश काढले आहेत. या जिल्हा बाह्य बदल्यामधून परिचारिकांना वगळण्यात यावे या मागणीसाठी परिचारिकांनी दि.१० ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून कामकाज करीत आंदोलन केले. दरम्यान, आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आरोग्य विभागाचे संचालकांकडे पाठविले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने ऑगस्ट २०२१ मध्ये बदल्यांचे आदेश काढले आहेत. या बदल्यांच्या आदेशामुळे परिचारकांच्या जिल्हा बाह्य बदल्या करण्यात येणार आहेत. मात्र परिचारिका जिल्ह्यात स्थायिक झालेल्या आहेत. तसेच कोरोनाची तिसरी लाट येणार असून त्यासाठी परिचारिकांना त्या नोकरी करीत असलेल्या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये सेवा देण्यासाठी आवश्यक असलेली आरोग्यासंबंधी सर्व माहिती झालेली आहे. तसेच दि. १ मे या काळात बदली अधिनियम २००५ नुसार व समुपदेशनाने बदली धोरणानुसार होणाऱ्या बदल्यामधून परिचारक वर्गास वगळण्यात यावे. दर वर्षी मे महिन्यामध्ये शासनाचे २००५ बदली धोरण राबविले जात असून परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना ३० टक्के बदल्या या ३१ मे २००५ च्या धोरणानुसार केल्या जातात. परंतू परिचारिका वर्ग केवळ रुग्ण सेवा करण्याचे काम करतो. त्यांचा शासकीय आर्थिक व्यवहाराची कोणतेही संबंध येत नाहीत. म्हणजेच त्या आर्थिक टेबलवरती काम करीत नाहीत. त्या बरोबरच परिचारिकांच्या रुग्नालया अंतर्गत विभागीय म्हणजे एका कक्षातून दुसऱ्या कक्षात बदल्या केल्या जातात. जिथे अशा विभागीय बदल्या होत नसतील तिथे अंतर्गत बदलीचे धोरण सक्तीने राबवावे म्हणजे बाहेरगावच्या बदल्यांनी होणारे कौटुंबिक नुकसान. यामध्ये खास मुलांचे शिक्षण व वयस्कर सासू-सासरे किंवा आई-वडील यांचे संगोपन व कुटूंब विस्कळीत होणे याविषयीच्या समस्या उद्भवणार नाहीत. त्यामुळे त्यांना प्रशासकीय बदल्यामधून परिचारिका वर्गाला वगळण्यात यावेत ३१ मे या काळात बदली अधिनियम २००५ नुसार व समुपदेशाने बदली धोरणानुसार होणाऱ्या बदल यामधून परिचारिका वर्गाला वगळण्यात यावे. बदली धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी दि‌. १० ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व सर्व शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली
 रुग्णसेवा देताना शांत मानसिकतेने परिचारिका सेवा देऊ शकतील. समुपदेशनाने जरी बदल्या केल्या तरी तीन शिफ्टमध्ये रुग्णालयात सेवा देणे बदली ठिकाणाहून येणे जाणे शक्य होणार नाही. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य गव्हर्नर नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा नलिनी दलभंजन, उपाध्यक्षा संगीता चिरके, सचिव सुलभा भड, खजिनदार प्रेमा निंबाळकर, सहसचिव मनोज शेळके, सहखजिनदार संध्या निकम, कार्याध्यक्ष सुनिता पोखरकर, अंंकीज सवाई, सुनिता मारकड, सुरेखा कोकाटे सुवर्णा देशमुख, बबिता पाटील, सरफराज सय्यद, मीरा दलभंजन आदींच्या सह्या आहेत.



 
Top