Views


*सारोळा-मसोबा पाटी रस्ताकामास सुरूवात
ठेकेदाराकडून कामाचा अखेर 'श्रीगणेशा'!मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत काम सारोळा, शिंदेवाडीसह वाघोलीतील शेतकऱ्यांची अडचण कायमस्वरूपी मिटणार! रस्ता मजबुतीकरणासह डांबरीकरणही होणार! सारोळा ग्रामपंचायत सदस्य बाकले यांच्या पाठपुराव्यास मोठे यश!*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

अनेक वर्षापासून रस्त्याअभावी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची होणारी गैरसोय आता कायमस्वरूपी मिटणार आहे. सारोळा-शिंदेवाडी-मसोबापाटी या ५.४७ किमी रस्ताकामास अखेर सुरूवात करण्यात आली आहे. रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, यासाठी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्यास मोठे यश मिळाले असून प्रत्यक्षात कामास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) ते शिंदेवाडी - मसोबा पाटी या ५.४७ किमीच्या रस्त्याची मोठी दूरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना चिखलातून वाट काढावे लागत. त्यामुळे सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाकडे वारंवार निवेदन देवून केली होती. तसेच यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर या रस्त्याचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत समावेश होवून रस्ताकामासाठी निधीही मंजूर झाला. मात्र रस्ताकामाची ई-निविदा काढण्यात आलेली नव्हती. त्यामुळे प्रत्यक्षात ई-निविदा नसल्याने कामासही सुरूवात झाली नव्हती. या रस्त्याची ई-निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच कामास सुरूवात करून ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी श्री. बाकले यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता सुनिता पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर तातडीने या कामाची निविदा काढण्यात आली. निविदा निघाल्यानंतर संबंधित एजन्सीला काम मिळाले. मात्र प्रत्यक्षात कामाची वर्कऑर्डर मिळत नसल्याने कामास सुरूवात करण्यात आली नव्हती. त्यानंतर श्री. बाकले यांनी कार्यकारी अभियंता पाटील यांची भेट घेवून तातडीने वर्कऑर्डर देवून काम सुरू करण्याची मागणी केली. याची तातडीने दखल घेवून वर्कऑर्डर ठेकेदारास देत प्रत्यक्षात या रस्ताकामास सुरूवातही करण्यात आली आहे. या रस्त्यावर मुरूम अंथरण्यासह दबई करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मंगळवारी (दि.१०) सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी या कामास भेट देवून पाहणी केली. यावेळी हभप ललत महाराज लिंगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 
Top