Views


*लोहारा तालुक्यातील नागरीकांना नविन, जिर्ण झालेल्या शिधापत्रिकेची दुय्यम प्रत द्यावी -- सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ढगे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील नागरीकांना नविन, जिर्ण झालेल्या शिधापत्रिकेची दुय्यम प्रत देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन लोहारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ढगे यांनी तहसीलदार यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यातील नागरीकांचे, पाल्याचे शैक्षणिक कामासाठी व नागरीकांचे वैद्यकीय, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, रमाई आवास घरकुल योजनेसाठी, बॅंक कामासाठी, अशा विविध कामांसाठी अंत्यत गरज आहे. याची शासन दरबारी नोंद घेऊन लोहारा तालुक्यातील नागरीकांना नविन, जिर्ण झालेल्या शिधापत्रिकेची दुय्यम प्रत तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ढगे, मुकेश वाघमारे, सुनिल रोडगे,. उपस्थित होते.
 
Top