Views*सारोळा येथील रस्त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक देण्यासाठी कार्यवाही सुरू -- शाखा अभियंता मैंदाड यांच्याकडून पाहणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथील रस्त्यांना ग्रामीण मार्ग देण्याची कार्यवाही अखेर सुरू करण्यात आली असून जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता आर. व्ही. मैंदाड यांनी गुरूवारी दि.5 ऑगस्ट रोजी या रस्त्यांची पाहणी केली. तसेच सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगितले असून सर्व कागदपत्रे जमा करण्यात येणार आहेत. आ.कैलास घाडगे-पाटील व सरपंच प्रशांत रणदिवे यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला आहे. सारोळा येथील बहुतांशी रस्त्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना या मार्गावरून वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच हे रस्ते कोणत्याही कृती आरखड्यात नसल्याने रस्ता काम करण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच निधी मिळत नसल्याने वर्षेनुवर्षे रस्त्याचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. हे रस्ते करण्याची शेतकऱ्यांसह ग्रामस्थांकडून वारंवार मागणी होत असून तत्काळ कृती आराखड्यात या रस्त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक देण्याचे निर्देश आ.कैलास घाडगे-पाटील यांनी मुख्य कार्यकारी अभियंत्यांना दिले होते. तसेच सरपंच प्रशांत रणदिवे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनीही यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यानंतर या रस्त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. गुरूवारी शाखा अभियंता मैंदाड यांनी प्रत्यक्षात सर्व रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असून गाव नकाशा, तालुका नकाशा, जिओ टॅगींग फोटो, गुगल मॅपवरून रस्त्याची दिशा दर्शविणारा फोटो यासह आवश्यक कागपदत्रे तत्काळ जमा करण्याचे श्री.मैंदाड यांनी सांगितले आहे. त्यामुळे तातडीने सर्व कागदपत्रांची पुर्तता करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी सांगितले. यावेळी रोहित कचरे, बाळासाहेब स्वामी, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. .
 
Top