Views*उस्मानाबाद-मेडसिंगा बस सुरू करा आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे मागणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद तालुक्यातील मेडसिंगा येथे बसअभावी वद्यिार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय सुरू आहे. त्यामुळे उस्मानाबाद-मेडसिंगा या मार्गावर बस सुरू करावी, अशी मागणी सरपंच अण्णा दुधभाते व विनोद बाकले यांनी आगारप्रमुख पाटील यांच्याकडे बुधवारी (दि.४) निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, मेडसिंगा येथे एसटी महामंडळाची एकही गाडी येत नाही. उस्मानाबाद-उजनी या राज्य मार्गापासून मेडसिंगा गाव तीन किमी अंतरावर आहे. मात्र गत अनेक वर्षापासून वद्यिार्थ्यांसह प्रवाशांना गावात बसचे साधे दर्शनही झालेले नाही. गावातील ग्रामस्थ विविध कामानिमत्ति तर वद्यिार्थी शक्षिणासाठी उस्मानाबाद शहरात मोठ्या संख्येने येतात. मात्र बसअभावी वद्यिार्थ्यांसह प्रवाशांना तीन किमीची पायपीट करून मेडसिंगा पाटीपर्यंत येतात. तसेच आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी वाहनाद्वारे प्रवास करत आहेत. त्यामुळे उस्मानाबाद-मेडसिंगा या मार्गावर एक स्पेशल बस फेरी करण्यात यावी. तसेच इतर बसही मेडसिंगा गावात वळवण्यिात याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. लवकरच या मार्गावर बस सुरू करण्याची ग्वाही आगारप्रमुख श्री पाटील यांनी दिली. यावेळी सरपंच अण्णा दुधभाते, सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले, मेडसिंगा ग्रामपंचायत सदस्य किशोर आगळे, सद्धिेश्वर शेलार, गोरोबा पकाले, विनोद लांडगे, ग्यानदेव पडवळ, दादा माने, महेश लांडगे, युवराज जाधव, धनाजी माने, किशोर साळुंके उपस्थित होते.
 
Top