Views


  *जिल्हा युवा मोर्चा युवा संकल्प तिरंगा ध्वज रैली संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 स्वातंत्र्य दिनाचे औचीत्य साधत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उस्मानाबाद शहरात जिल्हा युवा मोर्चा संकल्प तिरंगा ध्वज रैली काढण्यात आली. ही रॅली आ.राणाजगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात प्रतिष्ठाण भवन भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथुन करण्यात आली. तिरंगा ध्वज हातात घेऊन पुष्पचक्र घेऊन शहरातील संत गाडगेबाबा चौकातील हुतात्मा स्मारक येथे विर हुतात्म्यांना आदरांजली वाहत पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. तसेच छत्रपति शिवाजी महाराज चौक येथे राजमुद्रेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर ‍तिरंगा ध्वज रॅलीचा समारोप करण्यात आला. या तिरंगा ध्वज रॅलीत भाजपा प्र.का.स.ॲड.खंडेराव चौरे, भाजपा प्र. का. स.ॲड.अनिल काळे, भाजपा प्र.का.स.सतिष दंडनाईक, नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस ॲड.नितीन भोसले, प्रदिप शिंदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, सिताराम वनवे, राजकुमार पाटील, पिराजी मंजुळे, पांडुरंग लाटे, अनंत देशमुख, संजय लोखंडे, विनायक कुलकर्णी, राजाभाऊ पाटील, राहुल काकडे, पांडुरंग पवार, अभय इंगळे, युवराज नळे, दाजीप्पा पवार, चंद्रजित जाधव, शिवाजी पंडगुडवाले, झुंबर घोडके, नाना धत्तुरे, नामदेव नायकल, आषीश नायकल, विनोद निंबाळकर, अजय यादव, ओम नाईकवाडी, अमोलराजे निंबाळकर, प्रितम मुंडे, सुजित साळुंके, सुरज शेरकर, प्रसाद मुंडे, संदीप इंगळे, शरीफ शेख, सलमान शेख, महेश बागल, सदानंद आकोसकर, अजित खापरे, अमोल पेठे, संतोष क्षीरसागर, सुधीर नायकल, सुनील पंडगुडवाले, मनोजसिंह ठाकुर, कुलदीप भोसले, गीरीश पानसरे, तसेच सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी, युवा कार्यकर्ते यांनी युवा संकल्प रॅली मध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवला.
 
Top