Views    *युवानेते प्रितम (बंटी) मुंडे विचारमंच संपर्क कार्यालयाचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते उदघाटन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

दि. 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवसाचे औचित्य साधत उस्मानाबाद शहरातील बार्शी नाका येथे प्रीतम (बंटी) मुंडे विचार मंच संपर्क कार्यालयाचे उदघाटन लोकनेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पार पडले. शहरातील जिजाऊ चौक येथे स्वातंत्र्य दिनानिमीत्त पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या उदघाटन कार्यक्रमास मार्गदर्शन करत असतांना भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी प्रितम मुंडे यांचे काम उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे सांगीतले. सामान्य माणसांच्या अडचणी सोळविण्यासाठी अश्या संपर्क कार्यालयाची आज आवश्यकता असल्याचे ही सांगीतले. तसेच लोकनेते आ. राणाजगजितसिंह पाटील हे उदघाटन समारोपपर मार्गदर्शन करत असतांना म्हणाले की प्रितम मुंडे विचार मंच संपर्क कार्यालयाचा आदर्श घेऊन शहरात सर्व प्रभागांमध्ये संपर्क कार्यालय उघडुन सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करावे व त्यांचे प्रश्न मार्गी लावावे, शहरातील विकास कामे करत असतांना निधी अभावी जर कामे थांबत असतील तर मी सदैव आपणास मदत करण्यास प्राधान्य देईल असे आश्वासन लोकनेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर अण्णा पाटील, सतीश दंडनाईक, न.प. उप-अध्यक्ष अभय इंगळे, पांडुरंग लाटे सर, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, राजकुमार पाटील, शहर अध्यक्ष राहुल काकडे, नगरसेवक चंद्रजीत जाधव सर, युवराज (बप्पा) नळे, दाजी (अप्पा) पवार, अभिजित काकडे, संदिप (भैय्या) इंगळे, रोहित दंडनाईक, शिवाजी पंगुडवाले, संदीप साळुंके, श्याम भाऊ कुलकर्णी, झुंबर घोडके, नाना धत्तुरे, राजेशजी मुंडे, आदित्य पाटील, अभिराम पाटील, ओम नाईकवाडे, अमोलराजे निंबाळकर, सुरज शेरकर, कुलदीप भोसले, मनोजसिंह ठाकूर, स्वप्नील नाईकवाडी, संदीप इंगळे, शरीफ शेख, सलमान शेख, महेश बागल, सदानंद आकोसकर, अजित खापरे, अमोल पेठे, संतोष क्षीरसागर, अजय यादव, सुधीर नायकल, सुनील पंडगुडवाले, मनोजसिंह ठाकुर, कुलदीप भोसले, गीरीश पानसरे, काशिनाथ राजपूत, सागर खताळ, राधे बायस, अमोल पवार, आदित्य हंबीरे, अथर्व जाधव तसेच प्रभागातील जेष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top