Views



*दक्षिण जेवळी ते तुगाव रस्त्याला जोडनाऱ्या शेत रस्त्याच्या कामाला दक्षिण जेवळी येथील युवकांच्या पुढाकाराने लोकवाट्यातून सुरुवात*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

गेल्या सात-आठ वर्षांपासून रखडलेल्या लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी ते तुगाव रस्त्याला जोडनाऱ्या शेत रस्त्याच्या कामाला दक्षिण जेवळी येथील युवकांच्या पुढाकाराने सुरुवात झाली असून या शेत रस्त्याचे उर्वरित माती व मजबूती काम शेतकऱ्यांच्या लोकवाट्यातून होत आहे. ९३ च्या भूकंपानंतर नागरिकाच्या सोयीनुसार भूकंपा पूर्वीच्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर दक्षिण जेवळी गावचे पुनर्वसन झाले आहे. परंतु नव्या ठिकाणी वस्ती निर्माण झाल्याने शेतकऱ्यासाठी शेत रस्ते हेच मोठी समस्या निर्माण झाली आहे. या गावच्या पूर्वेला बहुतांशी शिवार असून शेत रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना शिवारात जाण्यासाठी मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. येथील शिवार हे काळ्यामातीचे असल्याने थोड्या ही पावसामुळे रस्ता चिखलमय होत असल्याने शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, राशी तसेच ऊस वाहतुकीसाठी मोठी हेळसांड होत आहे. सात- आठ वर्षाखाली येथील शेतकरी एकत्र येऊन दक्षिण जेवळी ते येथील शिवारातून जाणारा तुगाव रस्त्यापर्यंत शेत रस्ता खुल्ला करीत मातीकाम हाती घेतले होते.या रस्त्याचे काही ठिकाणी माती कामाबरोबच मजबूतीकरणही झाली होते. परंतु त्या वेळेस काही शेतकऱ्यांच्या अडवणूकीमुळे पुढील काम आतापर्यंत रखडले होते. रस्त्या अभावी मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांची हेळसांड लक्षात घेऊन पुन्हा येथील युवा शेतकरी सुरज कारभारी, सोमनाथ गुंजाटे, नागनाथ गुंजुटे, ओंकार जवळगे, प्रथमेश पाटील, शमशेर मुल्ला, धनराज गुंजाटे, शांतापा गुंजाटे, शरणप्पा गुंजाटे आदींनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी येथील महादेव मंदिरात शिवारातील सर्व शेतकऱ्यांची बैठका घेत शेतकऱ्यासाठी शेत रस्त्याचे महत्त्व समजून सांगितले. आता शुक्रवारी (ता. १३) येथील मंडळ अधिकारी एम एस स्वामी, सरपंच चंद्रकांत साखरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील, जगगनाथ  तोरकडे, महादेव पाटील, दौलाप्पा तोरकडे, विवेकानंद पाटील, श्रीशैल कोरळे आदी जेष्ठ शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्ता खुला करीत या शेत रस्त्याचे उर्वरित माती व मजबूती कामाला सुरुवात केली आहे.
 
Top