Views




*कळंब तालुक्यातील मंगरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 कळंब तालुक्यातील मंगरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्फुर्ती फाऊंडेशन व सावरकर स्मारक समिती, कळंब तालुका मराठी पत्रकार मंडळ यांच्या वतीने कोरोना काळात जिवाची पर्वा न करता अतिशय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोनायोद्धा म्हणून सत्कार करुन प्रमाणपत्र देण्यात आले. व तसेच फळांची झाडे भेट देऊन, प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सावरकर विचार मंचचे अध्यक्ष मकरंद पाटील, स्फुर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी गिड्डे पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.धनंजय चाळक, डॉ.भाग्यश्री ठोंबरे, डॉ.राहुल अडसूळ, डॉ.ज्योती माळी, डॉ.शितल दळवी, डॉ. दिपाली मोरे, डॉ.प्रविण राठोड, डॉ.उदयसिंह हुंबे, मधुकर कडबने, भाजपा नेते श्रीराम कापसे, सुपरवायझर बाबुराव जाधव, भास्कर मोरे, औषध निर्माता सत्यवृत सागर, आरोग्य सेवक सतीष मोरे, दत्ता राऊत, दुलसिंग राठोड, लॅब टेक्निशियन महारुद्र नक्शे, मैंदाड, आरोग्य सेविका सुरेखा कनगरकर, सविता पांढरे, पुजा पाटोळे, सुनंदा येवले, काविरा खंदारे, अश्विनी काळे, मनिषा राऊत, आशा सत्वधर, नंदा वाघमारे, चालक बालाजी भातलवंडे, परिचर विजय पवार,आशा गटप्रवर्तक प्रियंका कापसे, मनिषा हिरे, अर्धवेळ परिचर वंदना पांचाळ, महेश जोशी, सुरेश बोंदरे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व अशा कर्मचारी उपस्थित होते.
 
Top