Views



*शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवा -- माजी खा.प्रा. रवींद्र गायकवाड यांचे शिवसैनिकांना आदेश*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात 12 जुलै ते 21 जुलै या दरम्यान शिवसम्पर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने दि.13 जुलै रोजी उमरगा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उमरगा व लोहारा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना माजी खा.प्रा. गायकवाड म्हणाले कि, कोरोना काळातील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा-लोहारा तालुक्यातील शिवसेनेचे कार्य घराघरापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. आगामी नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी जास्तीत जास्त शिवसैनिक नोंदणी करावी व हे शिवसम्पर्क अभियान प्रभावीपणे राबवावे, असे यावेळी सांगितले. यावेळी युवानेते किरण गायकवाड, शिवसेना उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, यांनीही यावेळी शिवसैनिकांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, शहरप्रमुख मा.राजेंद्र सुर्यवंशी लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, जि.प.सदस्य शेखर घंटे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, युवा सेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, शहरप्रमुख अमर शिंदे उमरगा, लोहारा युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना गटनेते संतोष सगर, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, माजी नगरसेवक अभिमान खराडे, लोहारा शहरप्रमुख सलीम शेख, जिल्हा सहकारी बोर्ड संचालक अविनाश माळी, श्याम नारायणकर, लोहारा युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, अमीन सुंभेकर, महेबूब गवंडी, लोहारा मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष भरत सुतार, सरपंच नामदेव लोभे, परवेज तांबोळी, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, माजी नगरसेवक शेखर मूदकांना, शिवसेना विभागप्रमुख शेखर पाटील, आप्पासाहेब पाटील, प्रदीप शिवणेचारी, लिंगराज स्वामी, प्रशांत पोचापुरे, संदीप जगताप, युवा सेना मुरूम शहरप्रमुख भगत माळी, बाबासाहेब कटारे, संदीप चव्हाण, विक्रम दासमे,नागेश गायकवाड, युवराज गायकवाड, प्रदीपदादा मोरे, योगेश गायकवाड, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप जगताप यांनी केले तर आभार तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे यांनी मानले.
 
Top