Views





*उस्मानाबाद शहरात आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राचा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 भारत सरकार द्वारा राबविण्यात येणाऱ्या आत्मनिर्भर भारत या महत्वपुर्ण योजनेचा फायदा जास्तीत जास्त गरजु जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा उस्मानाबाद चे कार्यकर्ते सुरज शेरकर व युवा मोर्चाचे सहकारी यांच्या पुढाकारातुन आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. हे आत्मनिर्भर शिबीर जुने राम मंदिर, महाजन गल्ली येथे राबविण्यात आला.
 या कार्यक्रमाचे उदघाटन आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन शिबीराचे जिल्हा संयोजक भारत लोंढे यांनी या विषयी सविस्तर माहिती देतांना सांगीतले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन आत्मनिर्भर भारत या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी करण्यात आली. गेल्या दीड वर्षापासुन कोरोना महामारीने थैमान घातले असुन त्यामुळे छोटे व्यवसायीकांचे आर्थीक घडी पुर्णपणे विस्कटलेली आहे. त्यांना नवीन उभारी देण्यासाठी, किरकोळ भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाले, छोटे मोठे व्यापाऱ्यांना बँकेमार्फत आत्मनिर्भर होण्यासाठी सुरुवातीला १० हजार रुपये (भांडवल) मदत भेटत आहे, आणि त्याची परतफेड पण कमी व्याजदरात एक वर्षात (प्रतिमाह 900 रु) करायची आहे, जर पहिल्या कर्जाची परतफेड वेळेवर केली गेली तर पुन्हा 20000/- रुपये नवीन कर्ज भेटणार असल्याचेही सांगितले. आणि त्यामुळे छोटे-मोठे व्यापारी यांच्या उद्योग धंध्यास चालना मिळणार आहे व त्यांची आर्थीक घडी सुरळीत होणार आहे, या करिता मोजक्या कागदपत्रांच्या आधारे (आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक,) हे कर्ज वितरण केले जात असल्याचे लोंढे यांनी सांगीतले. तसेच याप्रसंगी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, केंद्र सरकारद्वारा राबविण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेचा लाभ हा आता पर्यंत अनेक लोकांना झाला आहे. आणि गरीब लोकांना या योजनेमुळे आत्मनिर्भर होण्यासाठी मदत आणि प्रोत्साहन भेटत आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व इतरानांही योजनेचा लाभ घेण्यास सांगावे असे आवाहन केले. या प्रसंगी आत्मनिर्भर मार्गदर्शन शिबीरात 90 लाभार्थ्यांनी नोंदणी केली व दिवसभरा मध्ये 450 लोकांनी या योजनेची माहीती घेतली. या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, भाजमुयो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, प्रविन सिरसाठे, सुरज शेरकर, नागेश जगदाळे, सलमान शेख, गणेश येडके, गणेश इंगळगी, प्रसाद मुंडे, प्रसाद राजमाने, किशोर पवार, मंगेश आयचीत, राज नवले, धंनजय जाधव, बालाजी इंगळे, व युवा मोर्चाचे कार्यकर्ते त्याच बरोबर शहरातील व ग्रामीण भागातील छोटे व्यवसायीक मोठया संख्येने या शिबीराचा लाभ घेण्यासाठी उपस्थीत होते.
 
Top