Views*भाजपा च्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांच्या वतीने हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमीत्त प्रतिष्ठाण भवन भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र घडविणारे महत्त्वाचे मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, यांच्यासोबत वसंतराव नाईक यांच्या नावाचा प्राधान्याने उल्लेख केला जातो. या महनिय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम करण्याचे काम केले. आज महाराष्ट्र जो काही घडला आहे त्यामध्ये सदरिल मुख्यमंत्र्यांचे योगदान महत्वाचे आहे.
महाराष्ट्र राज्याचे अकरावे मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उल्लेखनिय काम केले त्यामुळे महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण झाले. १ जुलै ही त्यांची जयंती कृषीदिन म्हणुन साजरी केली जाते. कृषीदिना निमीत्त चिखली ता.व जि.उस्मानाबाद येथील प्रगतशिल शेतकरी मेजर राजेंद्र ज्ञानदेव चव्हाण यांनी प्रति हेक्टर 73‍ क्वींटल ज्वारी उत्पादन घेतले त्यामुळे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सत्कार केला. याप्रसंगी भाजपा जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, किशोर पवार, तसेच भाजपाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top