Views


*ग्राहकांनी उपभोगावर संयम ठेवावा -- विभागीय अध्यक्ष सतिश माने*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

ग्राहकांनी उपभोगावर संयम ठेवत स्वदेशी वस्तूंचा वापर करणे, त्याचा अधिकाधिक आग्रह धरणे गरजेचे आहे. त्याचबरोबर माहिती घेण्याच्या अधिकाराचा वापर करणे, अन्यायाविरुध्द प्रसंगी एकाकी तर प्रसंगी संघटित लढा देणे, त्यासाठी ग्राहक चळवळीतील संघटनांचे मार्गदर्शन घेणे, स्वतःची चौकसबुद्धी जागृत ठेवून अन्यायाविरुध्द स्वतः उभे राहणे ही आजच्या काळाची नितांत आवश्यकता आहे. असे मत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य या संघटनेचे औरंगाबाद विभाग अध्यक्ष सतिश भाऊराव माने यांनी व्यक्त केले.
 दि.18 जुलै वार रविवार रोजी समर्पण करीअर इंस्टीटयुट उदगीर येथील सभागृहात शासनाचे कोरोना नियम पाळून आयोजित ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य या संघटने व्दारा घेण्यात आलेल्या जिल्हा अभ्यास वर्ग व नवनिर्वाचित औंरगाबाद विभाग अध्यक्ष, विभाग संघटक, लातूर जिल्हाअध्यक्ष, जिल्हासंघटक व पदधिकारी यांचा सत्कार उदगीर येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष व सत्कारमुर्ती नवनिर्वाचित नुतन औरंगाबाद विभाग अध्यक्ष सतिश भाऊराव माने हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विभाग संघटक हेमंतराव वडणे, लातूर जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रल्हादराव तिवारी, जिल्हाउपाध्यक्ष अॕड. नारायण सोमवंशी, जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, जिल्हा सहसंघटक शरद सूर्यवंशी, विवेक खरे, ग्राहक पंचायत चे उदगीर तालुका सल्लागार तथा विद्याविर्धनी इंग्लिश स्कुलचे प्राचार्य व्ही. एस.कणसे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे उदगीर तालुकाउपाध्यक्ष तथा सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाचे शिक्षक रामेश्वर महादेव पटवारी, सामाजिक कार्यकर्ते प्रभूराव पाटील, समर्पण करिअर इंस्टीटयुट चे संस्थापक मुख्य संचालक प्रा.अविनाशराव पाटील, प्रा.सुनिल ढगे, व्यवस्थापकीय संचालक विकास पाटील यांच्यासह उदगीर, जळकोट तालुका ग्राहक पंचायतचे पदधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरदार वल्लभाई पटेल विद्यालयाचे शिक्षक रामेश्वर महादेव पटवारी यांनी प्रास्ताविक भाषण केले. तर आभार जळकोट तालुका ग्राहक पंचायतीचे संघटक कैलास सोमुसे-पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण सोमवंशी, सुधाकर बाबर-पाटील, श्रीकांत बोडेवार, व्यंकटेश शिंदे, ओमकार शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
Top