Views


*आष्टा हायस्कुलचा निकाल शंभर टक्के*
 
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील येथील आष्टा का येथील शिक्षण संस्था संचलित आष्टा हायस्कूलचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला. प्रशालेने यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली आहे. मार्च 2021 मध्ये झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेस सदर विद्यालयाचे 82 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 82 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेचा शेकडा निकाल शंभर टक्के लागला. असून प्रशालेचे 48 विद्यार्थी विशेष प्रावीण्य, 34 विद्यार्थी प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणीत पास झाले आहे. कुमारी बेंळबे सोनाली विद्यार्थिनीने 93.60 टक्के गुण प्राप्त करून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. कुमारी सुतार राजनंदिनी या विद्यार्थीनीने 92.48 टक्के गुण घेऊन द्वितीय येण्याचा मान मिळविला तर 90.80 टक्के गुण घेऊन पटेल इदा अफसर हा तृतीय आला आहे. विद्यालयाच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष ओमप्रकाश चौधरी, संस्थेचे सचिव जयप्रकाश चौधरी, उपाध्यक्ष विक्रम चव्हाण, संचालकासह प्रशालेचे मुख्याध्यापक काजळे गोविंद, परिवेक्षक आनंद कांबळे व शिक्षक वृंदासह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सोमवारी दि.19, जुलै रोजी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक काजळे गोविंद यांच्या हस्ते प्रथम आलेली कुमारी बेंळबे सोनाली, द्वितीय क्रमांक सुतार राजनंदिनी, तृतीय क्रमांक पटेल, यांच्यासह सर्व विद्यार्थिनीचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top