Views


*उस्मानाबाद जिल्हा पेट्रोल पंप चालक/मालक असोसिएशनची कार्यकारणी जाहीर*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक/मालक यांची दि.16 जुलै 2021 रोजी उस्मानाबाद येथे बैठक संपन्न झाली. या झालेल्या संघटनेच्या बैठकीमध्ये खालील प्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील सर्व पंप चालक/मालक (डीलर) या असोसिएशनचे सदस्य राहतील. या नवीन कार्यकारणीचे सर्व सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुका स्तरावरील असोसिएशन लवकरच जाहीर करण्यात येतील असे दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले. सदरील जिल्हास्तरीय असोसिएशन हे देशपातळीवरील फामफेडा या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न आहे.
नवनियुक्त कार्यकारणी खालील प्रमाणे 
1/ दत्ता काशिनाथराव कुलकर्णी, उस्मानाबाद – जिल्हाध्यक्ष
2/ संजय केशवराव पाटील, उस्मानाबाद – जिल्हा कार्याध्यक्ष
3/गिरीश हंबीरे, उस्मानाबाद – जिल्हा सचिव
4/प्रशांत पंडितराव चेडे, वाशी – जिल्हा उपाध्यक्ष
5/बाळासाहेब क्षीरसागर, भूम - जिल्हा उपाध्यक्ष
6/रविंद्र शेरखाने, उस्मानाबाद - जिल्हा उपाध्यक्ष
7/रज्जाक अत्तार, उमरगा - जिल्हा उपाध्यक्ष
5/वैभव उंबरे, उस्मानाबाद – उस्मानाबाद शहर असोसिएशन अध्यक्ष
 
Top