Views*उस्मानाबाद येथे अखिल भारतीय छावा संघटने च्या बैठकीचे आयोजन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 अखिल भारतीय छावा संघटनेची जिल्हा आढावा बैठक व मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा व पत्रकार परिषदचे आयोजन अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सोमवार दि.12 जूलै रोजी सकाळी 11 वा. उस्मानाबाद शहरातील रायगड फंक्शन हाॅल येथे करण्यात आले आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. या बैठकीस केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, विजयकुमार घाडगे पाटील (युवा नेते प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी आघाडी), बालाजी दादा सुर्यवंशी (प्रदेश कार्याध्यक्ष), भिमराव भाऊ मराठे (केंद्रीय सह कार्याध्यक्ष), पंजाबराव काळे पाटील (प्रदेशाध्यक्ष), विष्णु महाराज कोळी ( मराठवाडा अध्यक्ष), उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, समाज बांधव यांनी उपस्थित रहावे, असे अवाहान अखिल भारतीय छावा संघटना उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनीकेले आहे.
 
Top