Views




*भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी
राजेंद्र सुरवसे यांची निवड*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद तालुक्यातील प्रगतशिल शेतकरी तसेच चिखली येथील मेजर राजेंद्र सुरवसे यांची भाजपा किसान मोर्चा धाराशिवच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वासुदेवराव काळे यांच्या प्रमुख उपस्थीतीमध्ये त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र सुरवसे यांनी रब्बी हंगामात एका हेक्टर शेतीत 73.6 क्वींटल ज्वारीचे उत्पादन केले होते. मराठवाडया सारख्या दुष्काळी भागात देखील अशा प्रकारे उत्पन्न घेता येते हे त्यांनी सिध्द करुन दाखवले. भारतीय जनता पार्टी व भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने शेतकरी संवाद अभियानाची सुरुवात तुळजाभवानीच्या पावन नगरीत दर्शन घेऊन उस्मानाबाद जिल्हापासुन करण्यात आली. या अभियानांतर्गत जिल्हा भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे औचित्य साधत उस्मानाबाद येथील भाजपा कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र सुरवसे यांची भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या प्रसंगी भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस मकरंद कोरडे, सुधाकर भोयर, रंगनाथ सोळंकी, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, तसेच भाजप प्र.का. सदस्य ॲड.खंडेराव चौरे, ॲड. व्यंकटराव गुंड, नेताजी पाटील, किसान मोर्चा मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, जिल्हा सरचिटणीस ॲड.नितीन भोसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, जिल्हाभरातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.
 
Top