Views*ऑक्सीजन ग्रुप व शिवसेनेच्यावतीने डॉक्टर्स डे साजरा*

कळंब(प्रतिनिधी)

 01 जुलै 2021 रोजी जागतिक डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून कोरोनासारख्या महामारीच्या काळात ज्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला अश्या डॉक्टरांचे आभार मानत ऑक्सिजन ग्रुप आणि कळंब तालुका शिवसेनेच्या वतीने "डॉक्टर्स डे" साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. श्री. शिवाजी आप्पा कापसे यांनी स्वीकारले व या कर्यामास डॉ. जीवन वायदंडे सर, डॉ. पाटील सर, डॉ. वायदंडे मॅडम, डॉ. पाटील मॅडम, डॉ. औटे सर, डॉ.चौधरी सर, डॉ. बिदरकर सर, डॉ. भालेराव सर. डॉ. जोशी सर, डॉ. दशरथ सर, डॉ. दशरथ मॅडम, डॉ. चव्हाण सर, डॉ. लोंढे सर, डॉ. गोरे मॅडम, डॉ. गीते मॅडम, डॉ. उबाळे मॅडम, डॉ. जगताप मॅडम, डॉ. पादील मॅडम, डॉ. शेळके सर तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते त्याचप्रमाणे ऑक्सिजन ग्रुपचे सदस्य सुशील तीर्थकर, अशोक काटे, चेतन कात्रे, आकीब पटेल, उदयचंद्र खंडागळे, तसेच व्यापारी इस्माईल हन्नुरे, सादिक पठाण, जावेद शेख, शंकर खंडागळे, रमेश अंबिरकर सर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तिर्थकर सर यांनी केले व डॉक्टर्स डे निमित्त घेतलेल्या सोहळ्यात डॉ. जोशी , डॉ. पाटील, डॉ. दशरथ व डॉ. वायदंडे यांनीही ऑक्सिजन ग्रुप व मा. शिवाजी आप्पा कापसे यांनी कोरोना कार्यकाळात केलेल्या जनसेवेचे कवतुक करत कार्यास बळ दिले. या उपजिल्हा रुग्णालयातील कार्यक्रमानंतर ऑक्सिजन ग्रुप व शिवसेना तालुक्याच्या वतीने कळंब येथील डॉ. रमेश जाधवर, डॉ. सचिन पवार, डॉ. रुपेश कवडे, डॉ. अभिजीत जाधवर, डॉ. जाधवर, डॉ. रमेश वाघ, डॉ. सुशीलकुमार ढेंगळे, डॉ. शिनगारे, डॉ. गोरे यांचाही प्रत्येकाच्या हॉस्पीटल मध्ये जाऊन सन्मान केला.

 
Top