Views

*अखील भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा अध्यक्षपदी परमेश्वर पालकर यांची निवड*

कळंब-(प्रतिनिधी) 

 अखील भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा अध्यक्ष पदी परमेश्वर लक्ष्मणराव पालकर यांची निवड करण्यात आली आहे.अखील भारतीय मराठी साहित्यदेची मराठवाडा विभागीय बैठक परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली कळंब शहरातील शासकीय विश्रामगृहात पार पडली यावेळी या बैठकीत पालकर यांना नियुक्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला.परमेश्वर पालकर यांनी गेली अनेक वर्षापासून साहीत्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे तसेच साहीत्य परिषदेच्या माध्यमातून मराठवाडाभर संघटनात्मक बांधणीमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची मराठवाडा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.यावेळी पालकर यांना परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे,राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी साहीत्य परिषदेचे लातुर विभागीय कार्याध्यक्ष बालाजी सुरवसे,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अशोक कुरूंद,जिल्हा उपाध्यक्ष योगराज पांचाळ,मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश धस,पञकार ओंकार कुलकर्णी,कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, सुजित शिंदे यांच्यासह साहीत्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top