Views*अचलेर येथील सिंगल फेज डीपीच्या तारेला शॉक लागून शेतकऱ्यांची शेळी मृत्यू पडली*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील पाण्याचा टाकीजवळील सिंगल फेज डीपीच्या तारेला शेतकऱ्याची शेळी चिटकुन शॉक लागून मृत्यू पडल्याची घटना घडली. याबाबत माहिती अशी कि, अचलेर येथील शेतकरी धानप्‍पा कलकुटगे शेळी घेऊन शेताकडे जात असताना दि. 13 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाचायच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळील सिंगल फेजच्या डिपीच्या तारेला करंट लागुन चिटकुन शेळी मरण पावली. आलुर येथील महावितरणच्या निष्काळजीपणा व गलथान कारभारामुळे शेळी मरण पावल्याने ग्रामस्थांतुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. हि घटना कळताच तात्काळ भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी भेट दिली. या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील व ग्रामस्थांनी केली आहे.
 
Top