Views


*अविनाश माळी, दिपक रोडगे, इंद्रजित लोमटे, श्रीशैल्य स्वामी, यांच्यासह अनेकांनी माजी खा.प्रा. रविंद्र गायकवाड व आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा शहरातील कॉंग्रेसचे नेते जिल्हा सहकार बोर्ड संचालक तथा लोहारा युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश माळी, हिप्परगा रवा येथील माजी पं.स. सदस्य दिपक रोडगे, माजी पं.स.सदस्य इंद्रजित लोमटे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल्य स्वामी यांनी कॉंग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडे दिला होता. यांनी पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने कोणत्या पक्षात जाणार याबाबत शहरात व तालुक्यात चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होते. अखेर अविनाश माळी, दिपक रोडगे, इंद्रजित लोमटे, श्रीशैल्य स्वामी, अमोल माळी, राजेंद्र माळी, यांच्यासह अनेकांनी दि.1 जुलै 2021 रोजी उमरगा येथे माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड, आ.ज्ञानराज चौगुले, यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी सुलतान शेठ, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख मोहन पणुरे, शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, शहर प्रमुख सलिम शेख, अभिमान खराडे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, प्रमोद बंगले, माजी पं.स.सदस्य सुधीर घोडके, अमिन सुंबेकर, महेबुब गवंडी, बालाजी माशाळकर, भरत सुतार, शिवा सुतार, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top