Views


*स्वर्गीय श्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त पंचायत समिती लोहारा येथे कृषी दिन साजरा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 श्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त पंचायत समिती लोहारा येथे दि.1 जुलै 2021 रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.
सभापती सौ.हेमलता रनखांब होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी एम.बी‌‌.बिडबाग उपस्थित होते. यावेळी शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी विजयकुमार कुलकर्णी यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी श्री वसंतराव नाईक यांच्या जीवनावर प्रकाश टाकून कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. या कार्यक्रमास सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, कृषी अधिकारी पंचायत समिती ज्ञानोबा मुळे, विस्तार अधिकारी पंचायत समिती किरण निंबाळकर, श्रीनिवास पाटील सरपंच हिप्परगा रवा राम मोरे, शंकर पाटील,
यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top