Views





*मराठा आरक्षण ,नामांतरासह विविध मागण्यासाठी छावा 9 ऑगस्ट क्रांती दिनापासुन दंडूके आंदोलन करणार - नानासाहेब जावळे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
           
अखिल भारतीय छावा संघटना अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या नेतृत्वा खाली उस्मानाबादचे नाव तात्काळ धाराशिव व औरंगाबाद चे संभाजीनगर ही नामांतरे करा अन्यथा 9 अॅगस्टपासुन आता मुक मोर्चे नाही तर दंडुके मोर्चे काढू आणि विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींना वटनीवर आणु असा इशारा छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला आहे. नानासाहेब जावळे हे उस्मानाबाद येथील रायगड फंक्शनं हॉल येते मराठा आरक्षण पुढील दिशा व अखिल भारतीय छावा संघटना धाराशिव ज़िल्हा आढावा बैठकित बोलत होते. यावेळी नानासाहेब बोलताना म्हणाले की, मराठा आरक्षण ही जबाबदारी पूर्ण पणे राज्य शासनाची जबाबदारी आहे. मराठा आरक्षणचा ह्य राज्यशासनाने अक्षरशः गळा घोटलेला आहे कारण मराठा आरक्षण हे मराठ्यांनी कुणा सोबत लढाई करावी हे सांगावे आम्ही कोर्टासोबत लढाई करावी, की राज्य शासना सोबत लढाई करावी की केंद्रासोबत लढाई करावी हे राज्याने मराठा समाजाला सांगावे कारण की मराठा समाज महाराष्ट्रात राहतो म्हणून ही जबादारी राज्यावर येते. हयांनी काल परवा अशा ठराव घेतला की केंद्रात 50%च आरक्षण रद्द करावे आणी मराठा आरक्षण दयावे जर तसच करायच होत तर 70 % काँग्रेस च देशावर राज्य होत तेव्हा काय जहाले होत मराठा आरक्षण द्यायला. त्यामुळे आताच शासन मराठा समाजाची दिशा भूल करत आहे. पुढे नानासाहेब म्हणाले की, मुख्यमंत्री शिवसेंनेचा, खासदार शिवसेंनेचा, 4 आमदार शिवसेंनेचें , नगराद्यक्ष शिवसेनेचा मग उस्मानाबादचें नामकरण धाराशिव का होऊ शकत नाही, तसेच औरंगाबादच नांव संभाजीनगर होऊ शकत नाही कारण बाळासाहेब ठाकरे यांना ह्य दोन्ही शहराचे नाव बद्दलायचें होते त्याच्या लढाल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हरताळ फासला आहे. त्यामुळे हयांना सत्तेत राहण्याचा अधीकार नाही तसेच राष्ट्रवादीची भूमिका मराठा आरक्षण बद्दल सन्धीक्त वाटत आहे तसेच शेतकऱ्यानंचा 7:12 कोरा करायच आमिष या शासनाने जनतेला दाखवून जनतेची दिशाभूल केली. यापूढे नानासाहेब म्हणाले छावा संघटन महाराष्ट्रत शांत बसणार नाही. मराठा आरक्षण व चुकीचा ऍट्रॉसिटी कायदा ह्य बद्दल छावा येणाऱ्या 9 ऑगस्ट क्रांतीदीना पासून छावा राज्यात आक्रमक भूमिका घेईल. या वेळी पहिल्यांदा छावा संघटना महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून अमृता अजिंक्य गायकवाड म्हणून तर छावा जिल्हा वकील सल्लागार म्हणून प्रथ्वीराज बाबासाहेब कोकाटे यांची आणि इतर पदे देण्यात आली. यावेळी शेतकरी. विद्यार्थी आघाडीचें प्रदेश अध्यक्ष विजयभय्या घाडगे, मराठवाडा अध्यक्ष विषणु कोळी, छावा प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गणेश जाधव, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हाकार्याध्यक्ष राजेंद्र साळुंके, युवक जिल्हाध्यक्ष कालिदास गायकवाड, तुळजापूर अध्यक्ष दिनेश रोचकरी, धाराशिव शहराध्यक्ष दादासाहेब कोरके, जिल्हा संपूर्ण जिल्हा समिती व छावा संघटना चें कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top