Views



*भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष, दृष्ठे शिक्षणतज्ञ महान देशभक्त डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना जयंती निमीत्त शतश: नमन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांच्या वतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रतिष्ठाण भवन जिल्हा भाजपा कार्यालय येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमीत्त प्रतिमापुजन करण्यात आले. भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष, एक थोर नेता, एक महाण नेतृत्व, कश्मीरसाठी लढा उभारणारे नेतृत्व, राष्ट्रीय ऐक्यासाठी ज्यांनी संघर्ष उभा केला अशा प्रखर राष्ट्रचिंतक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमीत्त भाजपा जिल्हा कार्यालयात तसेच जिल्हाभरात असंख्य ठिकाणी अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रतिष्ठाण भवन येथे भाजपाचे बुध्दीजीवी प्रकोष्ठ संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र.का.स.ॲड खंडेराव चौरे, जि.सरचिटणीस ॲड नितीन भोसले, भाजयुमो जि.अध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, ओबीसी मोर्चा जि.अध्यक्ष विजय शिंगाडे, एससी. मोर्चा जि.अध्यक्ष प्रविण सिरसाठे, तसेच भाजपाचे महिला मोर्चाच्या अर्चना अंबुरे, देवकन्या गाडे, लक्ष्मण माने, नगरसेवक प्रविण पाठक, दाजीप्पा पवार, सुजित साळुंके, सुनिल पंगडवाले, सुरज शेरकर, प्रसाद मुंडे, गिरीष पानसरे, मेसा जानराव, सार्थक पाटील, व जिल्हाभरातील भाजप व सर्व भाजपा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.
 
Top