Views


*अवैद्य धंद्याविरोधात निवेदन का दिले म्हणून भाजपाच्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कडून मारहाण*


कळंब (प्रतीनीधी)

  अवैद्य धंद्याविरोधात निवेदन का दिले म्हणून भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे यांच्यावर जिव घेणे हल्ला झाला आहे .या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.
 सोमवारी(दि.२१) रोजी कळंब तालुक्यातील वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्या विरोधात भाजप युवा मोर्चा च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. सदरचे निवेदन हे तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे यांच्या लेटर पॅडवर देण्यात आले होते
     दरम्यान आज मंगळवार (दि.२२) रोजी दुपारच्या सुमारास ढोकी नाका येथे प्रशांत लोमटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष दिनेश यादव आणि एकाने बोलावून अवैद्य या विरोधात निवेदन दिले असे म्हणत लोखंडी रॉड मारहाण केली असल्याची तक्रार लोमटे यांनी कळंब पोलिसात दिली आहे. या मारहाणीत लोमटे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्यांच्यावर कळंब उपजिल्हा रुग्णालयात उपचार उपचारासाठी दाखल केले असता त्यांच्या डोक्यात गंभीर जखम झाली असल्याचे कळते
   अवैद्य धंदे व पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या विरोधात निवेदन दिल्याने माझ्यावर हल्ला झाला असल्याचा लोमटे यांनी माहिती दिली आहे. तसेच मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याची तक्रार अर्ज पोलिसात प्रशांत लोंढे यांनी नमूद केले आहे .याप्रकरणी कळंब पोलिसात कलम ३२४,३२३,५०६,३४ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गर्दी केली होती.
 तर दिनेश यादव यांनी देखील प्रशांत लोमटे यांनी आपल्याला खंडणी मागितली असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली असल्याची माहिती मिळत आहे
 
Top