Views




*अकार्यक्षम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्यामुळे कळंब शहरातील कायदा आणि सुव्यवस्था आली धोक्यात---प्रशांत लोमटे*

कळंब (प्रतीनिधी)
 
   अकार्यक्षमतेमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत.असल्याचे निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय कळंब यांना देण्यात आले. कळंब पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, गुन्हेगारी, गांजा तस्करी, खून, फसवणूक यासारखे गुन्हे दररोज घडत आहे. कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. तानाजी दराडे यांनी 2019 साली कळंब पोलीस ठाण्याचे पदभार स्वीकारले आहे. पदभार स्वीकारल्याच्या अवघ्या काही महिन्यातच कळंब शहराच्या मध्यवर्ती चौकात दोन गटात तलवार, कोयता, कुऱ्हाडीने मारहाण झाली. इतकेच नव्हे तर भर चौकात गोळीबार झाला, ज्यामध्ये काहीजण गंभीर जखमी झाले होते.
     गेल्या दोन वर्षापासून अवैध वाळू वाहतूक, पत्त्यांचे क्लब, मटका बुकी, जुगार, सुरट यासारखे अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. यावर कसल्याही प्रकारचे कळंब पोलिसांचे अटकाव दिसत नाही.यामुळे अवैध धंद्यातून शहरात गुन्हेगारी वाढत आहे. बनावट दारूचे गुत्ते देखील शहरात उघडपणे सुरू आहेत. 
शहरात गुटखा मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत, हे कुणाच्या आशीर्वादाने दाखल होत आहे. याबाबत वेगळं सांगायला नको. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊनमध्ये गेल्यावर्षी वाकडी गावात हजारोच्या संख्येत लोक जमा होऊन कोणाच्या सहकार्याने कार्यक्रम पार पाडतात, याची देखील चौकशी उच्चस्तरीय समिती मार्फत होणे गरजेचे आहे. 
 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आत्तापर्यंत असंख्य चोऱ्या, दरोडे घालण्यात आले. यातील किती आरोपी पकडण्यात पोलीस निरीक्षक दराडे साहेबांच्या पोलिसांना यश आले, हा देखील मोठा प्रश्न आहे. मागच्या काही वर्षांपासून शहरातचं मोटारसायकल चोरी करणारी टोळी सक्रिय होती, याचा नुकताच पर्दाफाश झाला . 
 याच महिन्यात चोरीच्या उद्देशाने शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मार्केट यार्डच्या आडत दुकानातील वॉचमनची गोळी झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्ह्याचा छळा लावला. 12 आरोपी मार्केट यार्डमध्ये पार्टी करून चोरीची योजना आखून नंतर खून करतात, तोपर्यंत कळंब पोलीस काय करत होती?
 कळंब पोलीस स्टेशन हद्दीत तब्बल सव्वा कोटींचा गांजा पकडण्यात उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. इतका मोठा गांजा साठा आला कुठून? कळंब पोलिसांच्या नाकावर टिच्चून शेतात इतका मोठा साठा ठेवण्यात आला तरी कळंब पोलिसांना त्याची भनक सुद्धा लागली नाही. हे देखील पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या अकार्यक्षमपणाचे उदाहरण आहेत.
 त्या भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत
राखणे हे पोलिसांचे कर्तव्य असते. मात्र मागच्या दोन वर्षांमध्ये कळंब पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला पाहायला मिळाला. चोरी, दरोडा, खून, गांजा तस्करी, गुन्हेगारी, दोन गटात मारामारी, अवैध वाळू वाहतूक, मटका, जुगार, सुरर्ट, बनावट दारू विक्री, हफ्तेखोरी,गुटखविक्री हे सगळं सर्रासपणे सुरू आहे.हे सगळं पोलिसांचा अभय असल्याशिवाय सुरू राहू शकत नाही,अशी देखील चर्चा शहरात सुरू आहे.त्यामुळे अशा अकार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी,अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.कारवाई न झाल्यास पुढील काळात संविधानिक मार्गाने उग्र आंदोलन छेडण्यात येईल.या निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रोहित कोमटवार,अरुण काका चौधरी,संतोष कस्पटे,नागनाथ घुले,संदीप बाविकर, माणिक बोंदर,संजय जाधवर,मिनाज शेख,मतीन पटेल,सतपाल बनसोडे,रामकिसन कोकाटे,नारायण टेकाळे,मकरंद पाटील, शिवाजी गिड्डी,गोविंद चौधरी,अमर बारकुल,सचिन बारकुल, शिवाजी शेंडगे,संताजी विर,राजाराम अंबिरकर, अनंत बोराडे,मनोज पांचाळ,अण्णासाहेब शिंदे,विशाल ठोंबरे, बाबुराव शेंडगे,सुधीर बिक्कड,परशुराम देशमाने,बापू माने,जिव्हेश्वर कुचेकर,इम्रान मुल्ला,सोनू कवडे,यशवंत रितापुरे धम्मा वाघमारे,ज्योतिबा नवले,व सर्व भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top