Views



*पर्यावरण दिनानिमित्त बार्टी यांच्या वतीने वडगांव गां येथे वृक्षारोपण*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

  लोहारा तालुक्यातील वडगांव (गां) येथे बार्टी यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वडगांव व श्री एस पी हायस्कुल वडगांव येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, करंदी, तुळस, लिंब, शेवगा, चिंच आवळा, बदाम, चाफा, कडुनिंब, आदी वृक्ष लावण्यात आले. यावेळी झूम सॉफ्टवेयरचा लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी सदर कार्यक्रम ऑनलाईन पाहिला. तसेच वृक्षाचे संगोपन करण्यासाठी सूचना दिल्या. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लोहारा तालुका गटशिक्षणाधिकारी टी.एच.सय्यदा, ग्रामसेवक एच‌.एम‌.चौधरी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख बेळे, मुख्याध्यापक व्ही.एस.चंदनशिवे, मुख्याध्यापक व्ही.एम.गायकवाड, बार्टीचे समतादूत नागनाथ फुलसुंदर, किरण चिंचोले, सहशिक्षक पी.बी. फुलसुंदर, बी.एस.,माळी, जी.एस.बेडगे, वाय.एस. यल्लोरे, कर्मचारी ए.एस.गायकवाड, एम.एन. फुलसुंदर, व्ही.एम. गायकवाड, लक्ष्मी पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सर्वांनी मास्क लावून कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करण्यात आले. लोहारा व उमरगा तालुक्यातील प्रत्येकी 5 गावात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बार्टीचे समतादूत नागनाथ फुलसुंदर, किरण चिंचोले यांनी केले.
 
Top