Views
*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिप्परगा रवा 
येथील जि.प.प्रा.शाळेत वृक्षारोपण*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथील जि.प.प्रा.शाळेत दि.5 जुन 2021 रोजी वृक्षारोपण करण्यात आले. जि.प्र.प्रा.शाळेच्या प्रांगणात वड,पिंपळ, चिंच, अशा विविध जातीचे 50 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी नोडल ऑफिसर डि.एम.जंगम शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन केले‌. यावेळी सरपंच राम मोरे, ग्रामसेवक मुंडे, तलाठी कांबळे, पोलीस पाटील संजय नरगाळे,शाळा व्यस्थापन समिति अध्यक्ष अनिल आतनुरे, मुख्याध्यापक कांबळे मॅडम, एस.एम.शेख, एन.एस. बंगाले, जी.के. जाधव, श्रीमती एस.के‌.राठोड, एस‌.आर. घोडके, एस‌.बी. परिट, श्रीमती एस.बी.बिडवे, यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.
 
Top