Views*डॉ.शकील अहमद खान यांचा अंजुमन हेल्थकेअर सोसायटीतर्फे सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

ऑल इंडिया युनानी मेडिकल काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उस्मानाबाद शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र -1 वैराग रोड उस्मानाबाद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील अहमद खान यांचा अंजुमन हेल्थकेअर सोसायटीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष फेरोज पल्ला यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गोरगरीब कुटुंबातील गरजू रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळावेत यासाठी सातत्याने रुग्णसेवेत कार्यरत असलेल्या अंजुमन हेल्थ केअर सोसायटीला डॉ.शकील अहमद खान वेळोवेळी मार्गदर्शन व मदत करत आहेत. त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे आजपर्यंत अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. तसेच सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. नुकतेच ऑल इंडिया युनानी मेडिकल काँग्रेस या युनानी वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील संघटनेने त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून बहुमान दिला आहे. याबद्दल अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फेरोज पल्ला यांच्या हस्ते डॉ. शकील अहमद खान यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे सदस्य मोहसीन सय्यद, वसीम शेख, रिजवान शेख, कलीम शेख उपस्थित होते.
 
Top