*वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे : डिग्गीच्या माळरानावर वृक्षबिजारोपण --डॉ. विठ्ठलराव जाधव व डॉ. मुकुंद डिग्गीकर यांच्याहस्ते झाले वृक्षारोपण व बिजरोपण*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाचे नविन संकट सर्वासमोर आले. पहिल्यांदाच रुग्णांना ऑक्सिजनची इतक्या मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासली. वृक्ष लागवड तसेच निसर्गाचा समतोल अत्यावश्यक असल्याचे पहिल्यांदाच सर्वांसमोर आले. देशातील अनेक ठीकाणी शासनाच्या वतीने यासाठी लाखो रुपये खर्च करून वृक्ष संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जात असतो. व या कार्यासाठी अनेक सामाजीक संस्था, राजकीय पक्ष व संघटना स्वतःहुन पुढाकार घेत असतात. तसाच एक प्रयत्न डीग्गी गावातील ग्रामस्थांनी दोन वर्षापुर्वी केला व दोन एकरमध्ये वृक्षारोपण करून त्याचे संगोपन केले. सर्व झाडांची योग्य पध्दतीने निगा राखल्याने एका माळरानावर वनराई बहरली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या या वृक्षारोपण पाहण्यासाठी अनेक मान्यवरांनी यापुर्वीही भेठी दिल्या आहेत. आपल्या भागात शांतिदूत परिवार व रोटरी क्लबच्या वतीने सध्या वृक्षारोपण व सीड्स बॉलचे रोपण केले जात आहे. बुधवारी (ता.१६) रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.विठ्ठलराव जाधव व महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य उपसंचालक मुकुंदराव डिग्गीकर यांनी याठीकाणी भेट दिली. गावकऱ्यांच्या वतीने लोकसहभागातून केलेल्या या वृक्षसंवर्धनाबद्दल डॉ. जाधव यांनी पर्यावरण आणि जैव विविधतेच्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल अत्यंत महत्वाचा आहे. या वृक्षसंवर्धनासाठी नागरीकांचे कौतुक करून येणाऱ्या काळात युवापिढीने आपल्या परिसरामध्ये वृक्षलागवड करून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगुन वृक्ष संवर्धनासाठी व वृक्षारोपणासाठी शांतिदूत परिवार सदैव आपल्या पाठीशी असल्याचे यावेळी सांगितले. आरोग्य उपसंचालक डॉ.डिग्गीकर यांनी आपण सर्वजण पर्यावरणाचा समतोल आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहूया. आपल्या जन्मभुमीत केलेल्या या कार्याचे मला अभिमान असल्याचे सांगुन वृक्ष संवर्धनासाठी मी स्वतः यात सहभागी होऊन मदत करणार असल्याचे सांगितले. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले वृक्षारोपण डिग्गीकरांसाठी कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.जाधव डॉ. डिग्गीकर यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. डिग्गी येथील माळराणावर रोटरीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सीडबॉलचे बीज रोपण डॉ.जाधव व डॉ. डिग्गीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे समन्वयक तथा शांतिदूत परिवारचे प्रदेश सरचिटणीस प्रा. युसुफ मुल्ला, प्रा. जयवंत डिग्गीकर, प्रा. राहुल डिग्गीकर, सरपंच संतोष कवठे, युवराज गायकवाड, बाजार समितीचे माजी उपसभापती सिद्धाराम हत्तरगे, दिनकर गायकवाड, राजु कुलकर्णी, सुधिर शिंदे, प्रशांत डिग्गीकर, रियाज पठाण उपस्थित होते.