Views
*महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते आदरणीय.डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ५ ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर*

कळंब (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते आदरणीय.डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या वतीने ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कळंब तालुक्यासाठी तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.
  यामुळे ऑक्सिजन अभावी होणारी रुग्णांची गैरसोय थांबणार आहे. कोरोना आजारातुन बरे झालेले व घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना गरज असल्यास त्यांना हे कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येतील. हे O2 कॉन्सन्ट्रेटर देते वेळी कळंब तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंग राजेनिंबाळकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अरुण चौधरी, अब्दुल मुलांनी, गोविंद चौधरी उपस्थित होते.
 
Top