Views*उस्मानाबाद येथे भाजपा ओबीसी मोर्चाची ओबीसी आरक्षणासंबंधी बैठक संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 उस्मानाबाद येथील प्रतिष्ठान भवन कार्यालयात भाजपा ओबीसी मोर्चाची ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी मोर्चा बैठक दि.16 जुन 2021 रोजी संपन्न झाली. ओबीसी आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी पुढील दिशा ठरविण्याबाबत व पुन्हा स्थापित करण्यासाठी पदाधीका-यांना भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे व ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड.खंडेराव चौरे, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव पिराजी मंजुळे, ओबीसी आरक्षण संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, ज्येष्ठ मार्गदर्शक पांडुरंग लाटे गुरुजी, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, ओबीसी मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष भास्कर बोदर नंदकुमार माळी, बालाजी गावडे , राजाभाऊ सोनटक्के, बाळासाहेब वाडकर, नगरसेवक युवराज बप्पा नळे, दाजी अप्पा पवार, मनोज पवार, संतोष क्षीरसागर, ज्ञानेश्वर सूळ, सतीश कदम, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top