Views


*डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्र परिसरात बार्टी यांच्यावतीने वृक्षारोपण*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद येथे डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून ते 20 जून या पंधरवड्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण अभियान राबवण्यात येते आहे. या मध्ये पोलिस मुख्यालय परिसर , जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी परिसर, तसेच विविध शासकीय कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. दि.15 जून 2021 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्र परिसरात पिंपळ, वड, चिंच, आवळा, बेडा, आशा विविध जातीची एकूण 50 वृक्षाची लागवड करण्यात आली आली. या कार्यक्रमासाठी उपकेंद्राचे संचालक डॉ.डी.के. गायकवाड, उपसचिव डॉ.कराळे, कक्ष अधिकारी व्ही.एस. गुरव, जल व भूमी वेवस्थापण विभाग प्रमुख नितीन पाटील, बार्टीचे प्रकल्प अधिकारी तुषार कदम, समतादूत रमेश नरवडे, गोविंद लोमटे, नागेश फुलसुंदर, सुहास वाघमारे, किरण चिंचोले, गणेश मोटे, अर्चना रणदिवे, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
 
Top