Views




*सामाजिक कार्यकर्ते सचिन सुर्यवंशी यांच्यावतीने 
हराळी येथे गेल्या वर्षी फुटलेल्या बांध बंधीस्ती व
 ओढा रुंदीकरणाचे काम करण्यासाठी शेतकऱ्यांना
 मोफत जेसीबी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

सामाजिक कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी यांनी लोहारा तालुक्यातील हराळी गावातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षी फुटलेल्या बांध बंधीस्ती व ओढा रुंदीकरणाचे काम करण्यासाठी मोफत जेसीबी उपलब्ध करून दिली आहे. या कामासाठी शेतकरी डीझेल ची व्यवस्था करीत आहेत. व तसेच सचिन सुर्यवंशी यांच्या मोफत जेसीबी मार्फत हराळी परिसरात जलसंधारणाची कामे केली जात आहेत. सध्याच्या पर्जन्यमानाची अनियमितता व अनिश्चितता या कारणांमुळे कमी वेळेत जास्त तीव्रतेचा पाऊस पडत आहे. त्यामुळे बांध फुटून शेतातुन पाणी वाहून जात आहे. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. ( माती वाहून जात आहे.) या सर्व कारणांमुळे बांध बंधीस्ती होणे आवश्यक आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मागील कांही वर्षांपासून या विषयी जागृत करण्याचे काम लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून चालू आहे. यामुळे स्वइच्छेने शेतकरी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करीत आहेत. यांची परिसरात माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. जेसीबी मोफत दिल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून सामाजिक कार्यकर्ते सचिन सुर्यवंशी यांचे कौतुक करण्यात येत आहे.
 
Top