Views
*केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृंदावन फाऊंडेशन व स्फूर्ती फाऊंडेशन यांच्या वतीने ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर वास्तव्य करणार्‍या शाळकरी मुलींना शाळेत ये जा करण्यासाठी सायकल वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृंदावन फाऊंडेशन व स्फूर्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कळंब तालुक्यातील ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर वास्तव्य करणार्‍या शाळकरी मुलींना शाळेत ये जा करण्यासाठी सायकल देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यानुसार दि.1 जुलै 2021रोजी इटकूर येथील ज्ञानेश्वरी बाबासाहेब आडसूळ या इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीस सायकल भेट देण्यात आली. यावेळी स्फूर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव गिड्डे, सचिव मकरंद पाटील, भाजपाचे तालुका सरचिटणीस संजय जाधवर, पोहेकॉ मायंदे, पोकॉ विनोद चेडे, ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ कदम, सचीन गंभिरे, बिभीषण कुंभार, अमर आडसूळ, समाधान आडसुळ, प्रतिक आडसूळ, आदी उपस्थित होते.
 
Top