Views


*भारतीय जनता पक्षाचे कळंब येथे चक्का जाम अंदोलन*

कळंब/प्रतिनिधी

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण राज्य सरकारने रद्द केले त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने चक्काजाम आंदोलन शिवाजी चौकात कळंब याठिकाणी करण्यात आले. यावेळ सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आठ वेळेस नोटीस देऊन साधा आयोग नेमला नाही त्यामुळे सुप्रीम कोर्ट मधून आरक्षण रद्द झाले राज्य सरकारला जाग आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले त्या अनुषंगाने कळम तालुक्याच्या वतीने शिवाजी चौकात चक्काजाम अंदोलन केले. यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी शिंदे, अरुण चौधरी, संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य मदन तात्या बारकुल, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस देशमाने, परशुराम देशमाने, तालुका सरचिटणीस संजय जाधवर, माणिक बोंदर, संतोष कस्पटे, भैय्या बावीकर, शिवाजीराव गिड्डे, शिवाजी बाराते, भगवान ओव्हाळ, सुरेश कोरे, मकरंद पाटील, रामभाऊ अंबीरकर, त्रंबक कचरे, आनिल टेकाळे, रोहीत कोमटवार, पप्पू गायकवाड, हरिभाऊ शिंदे, आबा रणदिवे, मिनाज शेख, ईम्रान मुल्ला, सतपाल बनसोडे, सावता माळी, सतिश वैद्य, शिवाजी शेडगे, नारायण टेकाळे, आबा फरताडे, सायस जाधवर, श्रीकृष्ण जाधवर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top