Views


*राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा व ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित – आ. राणाजगजीतसिंह पाटील*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

प्रदेश सरचिटनीस आ.सुजीतसिंह ठाकुर व आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरात रास्ता रोको व चक्का जाम आंदोलन मोठया जनसंख्येने करण्यात आला. आंदोलनाची सुरुवात आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती निमीत्त छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे व समाजाप्रती असलेल्या अनास्थेमुळे ओबीसी समाजाला स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षणाला मुकावे लागले आहे तर मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण गमवावे लागले आहे. मा.सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणसंदर्भातील सुनावणी वेळी तारीख पे तारीख मागुन वेळकाढूपणा व ओबीसी समाजाचा अवमान करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी तसेच आरक्षण पूर्ववत होई पर्यन्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेवू नयेत या मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज जिल्ह्यातील सर्व तालुक्यासह तामलवाडी ता. तुळजापूर व येडशी ता. उस्मानाबाद येथील टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये नागरीकांनी उत्फुर्त सहभाग नोंदवत शासनाप्रती रोष व्यक्त केला. आंदोलन कर्त्यांना संबोधित करताना आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब म्हणाले की, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे व दुर्लक्षामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारने ‘राज्य मागासवर्गीय आयोगाचे’ गठन करुन राज्यातील ओबीसी समाजाचा ‘Empirical Data’ सादर करणे आवश्यक होते मात्र केवळ तारखा वाढवून मागत वेल्कधुपणा केला. आयोगाचे गठन न करता ओबीसी समाजप्रती सरकारने दाखवलेली असंवेदनशीलता अतिशय खेदजनक असुन चीड निर्माण करणारी आहे. सरकारच्या या नाकर्तेपणाचा फटका राज्यातील ओबीसी समाजाला बसला आहे. हीच बाब मराठा आरक्षणाच्या बाबत देखील झाली आहे. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचे भाषांतर न केल्याचा फटका मराठा आरक्षणाला बसला आहे. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मराठा समाजासाठी स्वतंत्र वसतिगृह या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासारख्या आहेत परंतु त्यामध्ये देखील चालढकल केली जात आहे. यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे म्हणाले की, भाजपा सरकार आरक्षण देणारे सरकार आहे तर महाविकास आघाडी सरकार आरक्षण घालवणारे आहे. देवेन्द्रजींनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण यांना टिकवता आले नाही. भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजाच्या पाठीशी खंबीर पणे उभी असून आगामी निवडणुकीत आम्ही समाजाला आरक्षणाच्या प्रमाणात उमेदवारी देवू अशी ग्वाही दिली. याप्रसंगी ओबीसी समाजासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य सरकारने ओबीसी व मराठा समाजाचे आरक्षण पूर्ववत करण्याबाबत तातडीने कार्यवाही करुन स्थानीक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत अन्यथा पुढील काळात लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल व आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा यावेळी बोलताना आंदोलकांनी सरकारला दिला आहे. या प्रसंगी आंदोलन स्थळी भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठचे दत्ताभाऊ कुलकर्णी, सुधीर पाटील, ॲड.खंडेराव चौरे, ॲड.व्यंकटराव गुंड, सतिश दंडनाईक, नेताजी पाटील, पिराजी मंजुळे, इंद्रजीत देवकते, ॲड.नितीन भोसले, प्रदीप शिंदे, राजा भाऊ पाटील, राजसिंह राजेनिंबाळकर, प्रविन सिरसाटे, निहाल काझी, रामदास कोळगे, लक्ष्मण माने, राहुल काकडे, पांडुरंग लाटे, तसेच अनंत देशमुख, संजय लोखंडे, गजानन नलावडे, अभय इंगळे, दाजीप्पा पवार, प्रविन पाठक, नामदेव नाईकल, विनायक कुलकर्णी, अनिल ‍ शिंदे, दत्ता सोनटक्के, बी.जी.गावडे, सुधीर करंजकर, महेश चांदणे, पांडूरंग अण्णा पवार, नाना वाघ, प्रमोद देशमुख, देवदत्त गोरे, भारत डोलारे, ॲड.शेटे, ओबीसी समाजाचे तसेच भाजपचे असंख्य पदाधिकारी आंदोलन स्थळी उपस्थीत होते. येडशीप्रमाणे तामलवाडी टोल नाका येथेपन चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आ.राणा दादा पाटील राज्यातील निक्रिय सरकारच्या कार्यपद्धतीचा समाचार घेताना मागास आयोग व ईपेरिकेल डाटा याची अंमलबजावणी करावी. अन्यथा आक्रोशला बाळी पडावे लागेल असा इशारा दिला यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, बाळासाहेब श्यामराजे, आदेश कोळी, गुलचंद व्यवहारे, इंद्रजित साळुंके, साहेबराव घुगे, प्रभाकर मुळे, गणेश सोनटक्के, यांची भाषणे झाली. सरकार विरोधी घोषणांचा निबाद करीत तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते चक्का जाम आंदोलनात सहभागी होते. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे, विक्रम देशमुख, नारायण ननावरे, दत्ता राजमाने, वसंत वडगावे, ओबीसी तालुकाध्यक्ष फिरोज मुजावर, शरद जमदाडे, भिवा इंगोले, अण्णा लोंढे, आनंद कंदले, बापू कणे, शिवाजी बोधले, सुहास साळुंके, सुशांत भूमकर, अरविंद पाटील, महादेव पाटील, अण्णा सरडे, बाबा बेटकर, दत्ता शिंदे, उपस्थित होते.
 
Top