Views

*कॉंग्रेसचे नेते जिल्हा सहकार बोर्ड संचालक तथा माजी युवक तालुकाध्यक्ष अविनाश माळी यांच्यासह पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, इंद्रजित लोमटे, ओबीसी सेल माजी तालुकाध्यक्ष श्रीशैल्य स्वामी, अदिंनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने कॉंग्रेस पक्षाला धक्का*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

कॉंग्रेसचे नेते जिल्हा सहकार बोर्ड संचालक तथा लोहारा युवक काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष अविनाश माळी, पं.स. माजी सदस्य, माजी उपसरपंच दिपक रोडगे, पं.स.माजी सदस्य इंद्रजित लोमटे, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा काँग्रेस ओबीसी सेल माजी तालुकाध्यक्ष श्रीशैल्य स्वामी यांच्यासह राजेंद्र क्षीरसागर, अमोल माळी यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडे दिला आहे. यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेस पक्षाला फार मोठा धक्का बसला आहे. लोहारा शहरातील नगरपंचायत निवडणूकीच्या ऐन तोंडावर यांनी राजीनामा दिल्याने शहरात व तालुक्यात कॉंग्रेस पक्षाची फार मोठी हानी होणार आहे. यामुळे कॉंग्रेस पक्षाला फार मोठा धक्का बसला आहे. लोहारा शहरातील अविनाश माळी यांच्या पत्नी सौ.मिरा अविनाश माळी जि.प.सदस्या होत्या. तर यांचे बंधु श्रीनिवास माळी लोहारा नगरपंचायतचे नगरसेवक होते. अविनाश माळी यांनी विविध माध्यमातून सामाजिक कार्य करुन शहरात व तालुक्यात चांगला मोठा जनसंपर्क ठेवला आहे. तालुक्यातील हिप्परगा रवा येथील पं.स.माजी सदस्य इंद्रजित लोमटे व दिपक रोडगे, श्रीशैल्य स्वामी यांचाही चांगला जनसंपर्क आहे. जनमतातील या पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने पक्षांमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. लोहारा शहरातील विकासासाठी पक्षाचा राजीनामा देऊन लोहारा शहर विकास आघाडी स्थापन करून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

 
Top